Home महाराष्ट्र न्याय झालाय पण ही पद्धत अन्यायकारक- नवाब मलिक

न्याय झालाय पण ही पद्धत अन्यायकारक- नवाब मलिक

मुंबई : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना एन्काउंटरमध्ये पोलिसांनी ठार केलं आहे. यावरून आता पोलिसांचं वर्तन चूक की बरोबर याची चर्चा आता सुरू झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

कायद्याची प्रक्रिया पूर्ण करुन चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे, असं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे.

हैदराबादमध्ये जी घटना घडली होती. त्या घटनेतील चार आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. न्याय देण्याची ही पद्धत नाही. अन्यायकारक पद्धतीने न्याय देणे योग्य नाही, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या एन्काउंटरचे पडसाद देशभर उमटत आहेत. सामान्य नागरिकांनी हैदराबाद पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. पीडितेला तत्काळ न्याय मिळाल्याची लोकांची भावना आहे. मात्र, काही ठिकाणी या घटनेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनीही या घटनेबाबत आक्षेप घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भारतानं टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

मानवधिकार आयोग करणार हैदराबाद एन्काऊंटरची सखोल चौकशी

“उत्तर प्रदेश, दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवं”

हैदराबाद बलात्कार प्रकरण; “आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल”