“…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू”; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

0
419

मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या, असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.

“शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे”, असंही ट्विट करत त्यांनी शिवसेनेवरन टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

संजय राऊत नोटीसला घाबरत नाही तर त्यांनी ईडीला हिशोब द्यावा- रामदास आठवले

“तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की…;”- संजय राऊत

गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here