मुंबई : उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होतं. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
योगी म्हणतात त्याप्रमाणे असेल तर मग यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारच राज ठाकरे यांनी दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा, असंही राज ठाकरे म्हणाले.
https://www.facebook.com/RajThackeray/posts/814573852407099
महत्वाच्या घडामोडी –
…म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
राजकारण करु नका हे नेमकं सांगताय कुणाला?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्याना खोचक टोला
केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?; उद्धव ठाकरेंचा सवाल
ट्रेंडिंग घडामोडी –
राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत आहे- देवेंद्र फडणवीसhttps://t.co/ZEya6ratIl@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @OfficeofUT @ShivSena @AghadiMahavikas
— घडामोडी (@ghadamodi1) May 25, 2020