Home पुणे “…मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?”; शिवसेनेचा सवाल

“…मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?”; शिवसेनेचा सवाल

पुणे : “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं होतं. यावरुन शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय.

“अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे, अहो कोल्हे, ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका”, असं किशोर कान्हेरे यांनी म्हटलं आहे.

तुम्ही कशाला फार विचार करता, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका, असंही किशोर कान्हेरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“…अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”

सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतांचा जावईशोध; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

“पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर आमचे नेते त्यांचा योग्य मानसन्मान करतील”

शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहे, त्यामुळे…; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य