आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठा समाजाची काल सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर ‘शिवछत्रपती’ संघटनेचे नेते अमर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधत नाराजी व्यक्त केली.
जसं पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते तसं या मुख्यमंत्र्यांकडे पण बडवे आहेत. मराठा समाजाची बैठक बोलवली तर शेवटच्या घटकालाही बोलता आलं पाहिजे, असं म्हणत देशमुख यांनी आपला संताप यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा : शिवसेनेच्या ताकदीत वाढ; पंजाब आणि हिमाचलमधील शिवसैनिकांनी दिली उद्धव ठाकरेंना साथ
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चाच झाली नसून आपण या बैठकीनंतर समाधानी नसल्याचं म्हणत देशमुख यांनी आपण पुन्हा मराठा समाजाला घेऊन मोर्चे काढण्याचा इशारा यावेळी दिला आहे.
मराठा समाजातील केवळ पहिल्या फळीतील लोकांना आणि त्यातूनही भाजपाशी जवळीक असणाऱ्या नेत्यांनाच बोलण्याची संधी दिल्याचा दावा यावेळी देशमुख यांनी यावेळी केला. जे जुने नेते आहेत, जे भाजपसाठी लांगूलचालन करतात, त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं या बैठकीमध्ये, असंही देशमुख म्हणाले. तसेच सारथी संघटना, नरेंद्र पाटील महामंडळ यासंदर्भात चर्चा झाल्याचं समाधान आहे. मात्र मुद्दा आरक्षणाचा होता त्याचं काही झालं नाही, असंही देशमुख म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?; राज ठाकरे संतापले
हा पक्ष आहे की चोर बाजार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
मनसे-भाजप युती होणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान, म्हणाले…