…मग मुख्यमंत्री घरीच का?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
187

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फिरत आहेत. त्यांना कोरोनाची भीती वाटत नाही. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कसं चालेल? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, हे एकवेळ चालेल. पण ते मातोश्रीवरसुद्धा कुणाला भेटत नाहीत. मग सरकार कसं चालेल? शेवटी जोपर्यंत सरकारचा धाक येत नाही तोपर्यंत प्रशासन चालतच नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीवर देखील चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

दरम्यान, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात त्यांना भेटायला जायला हवं, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

हे सरकार नाही सर्कस आहे; नितेश राणेंचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र

‘देऊळ बंद 2…आता परीक्षा देवाची’; प्रवीण तरडेंनी केली देऊळ बंद चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा

‘या” कारणासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण वाचवलं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here