“…तर मग फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”

0
332

मुंबई : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असं वक्तव्य शरजील उस्मानी याने केलं होतं. या वक्तव्यानंतर देवेंद्र फणडणवीस यांनी शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केली. यावरून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल करत कोळसे-पाटील यांनी देवंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारेही हिंदूच आहेत. आमच्यार गुन्हे दाखल करायचे असतील तर करावेत. आमची भाषणं तपासावीत, आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, असं कोळसे- पाटील म्हणाले.

शरजीलच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागतो. शरजीलने हिंदू ऐवजी मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता. मात्र, मी त्याचा निषेध करणार नाही आणि त्याच्या वक्तव्याचं समर्थनही करणार नाही, असंही कोळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय?; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल

येत्या 15 फेब्रवारीपासून महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत

“शिवरायांना अभिवादन करताना योगींना आधी चप्पल काढायला शिकवा”

…तर अजित पवार बारामतीत सुद्धा फिरू शकणार नाहीत; निलेश राणेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here