“…तर आम्ही रूग्णांचे नातेवाईक आणि डाॅक्टर्संना सुजय विखे पाटलांचा नंबर दिला असता”

0
269

पुणे : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच स्थितीत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी खास दिल्लीहून विमानाने नगरसाठी 10 हजार रेमडिसिवीर इंजेक्शन्स आणले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हांला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. हा प्रकार अतिश्य गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालायने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत., असं जयंत पाटील म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे येतील, असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं

महत्वाच्या घडामोडी –

“फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना चाैकशीसाठी समन्स”

“देवेंद्र फडणवीस नागपुरमध्ये ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”

“परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला; अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

लसींच्या दराबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान गप्प का?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here