मुंबई : आरोग्य यंत्रणा आणि ऑक्सिजन बेडसचा तुटवडा असतानाही महाराष्ट्राने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना केला. पण आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. परंतु, कोरोनाची दुसरी लाट पूर्णणे ओसरलेली नाही. तिसरी लाट कधी येईल सांगता येत नाही, असा गंभीर इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल असे उपदेशाचे डोस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मग ती मेट्रोच्या कार्यक्रमात जमवलेली हजारोंची गर्दी दुसरी लाट थोपवण्यासाठी होती का?, असं ट्विट करत भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल असे उपदेशाचे डोस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
मग ती मेट्रोच्या कार्यक्रमात जमवलेली हजारोंची गर्दी दुसरी लाट थोपवण्यासाठी होती का? @OfficeofUT https://t.co/H3lG6qXJcO— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत मुंबईतील एच.एन रिलायन्स रूग्णालयात दाखल”
“आता वाटायला लागलंय, मुख्यमंत्र्यांनाच तिसरी लाट हवी आहे”
तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरी लाटच पुन्हा उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“होय, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे”