मुंबई : दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांशी बोलून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधीवर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.
स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्या साठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्या बरोबर चालणे ही राहुल गांधींची ड्रामा बाजी आहे, असं निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे माणुसकी इथे व्यक्त होतेच, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्या साठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे ,त्यांच्या बरोबर चालणे.. राहुल गांधींची ड्रामा बाजी आहे असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे
जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे
माणुसकी इथे व्यक्त होतेच— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 18, 2020
महत्वाच्या घडामोडी-
काश्मीर आमचं आहे, होतं आणि आमचंच राहणार; आफ्रिदीला शिखर धवनचं सडेतोड उत्तर
लोकांमध्ये जाण्याची जी माझी सवय होती त्याचे परिणाम मला भोगावे लागले- जितेंद्र आव्हाड
हे सरकार आघाडीचं आहे की वाधवान सरकार?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
…अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत ; हरभजन सिंगचा शाहिद आफ्रिदीला इशारा