…तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही; भाजपच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

0
555

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल मुस्लिमांनी अमरावती जिल्ह्यात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावावर लाठीमार केला होता. त्यामुळे शहरात प्रचंड हिंसाचार झाला होता.

अमरावतीत झालेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात 4 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली होती. या बंद दरम्यान, जाळपोळ आणि हिंसाचार झाला. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी माजी राज्यमंत्री आणि भाजपा आमदार प्रवीण पोटे यांना अटक केली. 13 नोव्हेंबरला प्रवीण पोटे यांनीच अमरावती बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर पोटे यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत अटक करून घेतली. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अमरावतीत इंटरनेट सेवा पूर्ण बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने काश्मीरसारखी परिस्थिती अमरावतीत निर्माण केली आहे. आपण हिंदू पेटलेला पाहत आहोत. हिंदूंनी फक्त काडी दाखवली आहे, काडी मारलेली नाही. काडी मारली तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही. हिंदूंना चिरडू नये अन्यथा तुमचं आम्ही काहीही ठेवणार नाही.,असा इशारा पोटे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण”

“राष्ट्रवादीला मोठा धक्का; गोंदियाच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश”

…तर बाळासाहेबांनी त्यांना 5 फूट जमिनीत गाडलं असतं; शिवसेनेचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here