मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलन केलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आंदोलनावर टीका केली आहे.
मंदिरांना इतक्या महिन्यानंतरही टाळं लागणं हे काही आनंदाने केलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार हे टप्प्याटप्याने अनेक गोष्टी सुरु करत आहेत. भविष्यात लवकरच मंदिरं, रेल्वे सुरु होण्यासंदर्भात चर्चा होईल. विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात जी गर्दी जमवली आहे ती रेटारेटी सुरु आहे,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पाया पडतानाचा फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रणव मुखर्जींंना श्रद्धांजली
“अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द”
भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर मुलगा गमावला; शरद पवारांचं भावूक ट्विट
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन