“…तर नाशिकमध्ये भाजपची सत्ता उलथवून पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच”

0
481

नाशिक : मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी अनेक युवकांनी मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नाशिक महापालिकेत असलेली भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढचे सहा महिने पक्षासाठी स्वत:ला झोकून घ्यावे. असं झाल्यास पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल, असं आवाहन मेहबूब शेख यांनी केलं आहे.

उमेदवारी देताना जास्तीत जास्त युवकांना संधी देण्याची विनंती शरद पवार यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं सांगतानाच प्रत्येकाची मेहनत करण्याची तयारी असायला हवी. पद मिळाले नाही किंवा संधी मिळाली नाही म्हणून नाराज होता कामा नये. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते. त्याचप्रमाणे राजकारणातदेखील दोन पावले मागे जावे लागले तरी चालेल. भविष्यात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असंही मेहबूब शेख म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यपाल महोदय 8 वा महिना लागला, निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार?”

कोरोना काळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं, हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी- नाना पटोले

“नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही”

आमचं तीन पक्षाचं सरकार ‘अमर,अकबर,अँथनी’ प्रमाणे हिट होणार; नाना पटोलेंचं दानवेंना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here