मुंबई : महाराष्ट्रात 7 आणि 8 सप्टेंबर या दोन दिवसात पावसाळी अधिवेशन भरवण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या कामकाजानंतर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावं, असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.
करोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. करोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार कसे अपयशी ठरले आहे, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुद्देसूद भाषण केले. मात्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही, असं नारायण राणे म्हणाले.
दोन दिवसाच्या अधिवेशनात सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातल्याने अनेक विधेयके चर्चेविनाच मंजूर केली गेली. जर नियतीनं भविष्यात कधी अधिवेशन घेण्याची वेळ आलीच. तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावं, तास दोन तासांचं,” असा टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी-
राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका
राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
बात हरामखोरीची निघाली तर…; आशिष शेलारांचा सामनावर निशाणा