…तर देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत; पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवर राज ठाकरेंचा गृहमंत्र्यांना इशारा

0
287

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रीय तपास एजन्सीनं पुण्यासह देशभरात पाॅप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन केलं. यावेळी पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाह हूं अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. , असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : गृहमंत्रीपदासाठी अजित दादा योग्य, राष्ट्रवादीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचले पाहिजे. ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, या गंभीर आरोपांखाली थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी तरीही त्या देशद्रोह्यांना समर्थन करत जर या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरे आमच्या देशात चालणार नाहीत. माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित आहे., असं राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

गृहमंत्रीपदासाठी अजित दादा योग्य, राष्ट्रवादीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो: मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?; खुद्द एकनाथ खडसेंनी केला खुलासा, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here