आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चंद्रपूर : शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्त राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होऊ शकली नसती, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
हे ही वाचा : भाजप हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत- उद्धव ठाकरे
‘ज्या आघाडीला सुरुवातीला महाशिव आघाडी असं नामकरण केलं जाणार होतं, त्याऐवजी शिव या शब्दाला ज्यांनी विरोध केला, त्यांच्यासोबत बाळासाहेब कधीच गेले नसते. विचाराच्या आधारावर एक राजकीय पक्ष निर्माण झाला होता. काँग्रेससोबत जाण्याऐवजी मी शिवसेना बंद करेल, मी पक्ष विसर्जित करेल इतकी तिखट भूमिका ठाकरे यांची होती, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या विचारात सामर्थ्य होतं. सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष कधी एकत्र आले नव्हते’, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठं पद?; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
बाळासाहेब ठाकरे आज असते तर…; संजय राऊतांनी दिला आठवणींना उजाळा