Home महाराष्ट्र … तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार- उद्धव ठाकरे

… तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार- उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला  सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट निर्मात्यांना काहीसं दिलासं देणारं वक्तव्य केलंय.

“निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ब्रेक दि चेनमधील नव्या वर्गवारीप्रमाणे नियमांचे पालन करा. येत्या काळात मुंबईतील कोविड बधितांची संख्या नियंत्रणात आली, तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देऊ,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटंल आहे.

राज्यभरातील कोविडच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असं आवाहनही केलं.

दरम्यान, या संवादात निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले आहे. राज्यातील चित्रपट आणि वाहिन्यांवरील निर्मात्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मातोश्री निवास स्थान आणि दूरदृष्टी प्रणाली द्वारे आयोजित करण्यात आली होती.

महत्वाच्या घडामोडी –

“पवारांच्या ड्रॉव्हरमधून आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते?”

उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले- निलेश राणे

खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा- चित्रा वाघ

काही चुकलं असेल तर दिलगिर आहे, दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही; संभाजीराजे रायगडावरून कडाडले