Home महत्वाच्या बातम्या “…तर राज्यात पुन्हा महा विकास आघाडी सरकार येईल”

“…तर राज्यात पुन्हा महा विकास आघाडी सरकार येईल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला :  उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या वाद चांगलाच पेटला आहे. असून  शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? 16 आमदार पात्र की अपात्र? अशा याचिकांवर सुप्रीम कोर्टात  सुनावणी सुरू आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा : बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू, थापा शिंदे गटात का गेले?; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“या न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळले तर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येऊ शकते.” असं नाना पटोले म्हणाले आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये नाना पटोले बोलत होते.

“महाराष्ट्रातील सरकारच मुळात असांविधानिक आहे, असे न्यायालयातील सुनावणीत स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील सदस्यत्व अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना त्यांचे मुख्यमंत्री म्हणून निर्णय वैध कसे?” असा सवालही नाना पटोलेंनी यावेळी केला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘आमची निष्ठा राज ठाकरे आणि मनसेसोबतच’, मनसैनिकांनी दिले एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं

‘.. या कारणासाठी राष्ट्रवादी-भाजपचे बडे नेते एकाच मंचावर’ ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; बाळासाहेबांच्या विश्वासू सेवेकरीनं शिंदे गटात केला प्रवेश