आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कालच्या कॅबिनेटमध्ये 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यावरुन मात्र, ही मदत कधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच दिवाळीपूर्वी जर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही तर सर्व शेतकऱ्यांसह मातोश्रीवर जाऊ, असा इशारा बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
हे ही वाचा –…तर आता फडणवीसांना दिवसाही स्वप्न पडू लागलीत; नाना पटोलेंचा टोला
यंदा निसर्गाने शेतकऱ्याला साथ दिलेली नाही. अतिवृष्टी, पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतीसह पिकं आणि त्यांची घरे वाहून गेली. शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर आहे. अमरावतीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिज, असं रवी राणा म्हणाले आहेत.
दरम्यान, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता आली नाही तर मातोश्रीवरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे सरकारची ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची- सदाभाऊ खोत
मनसेसोबत युती बाबत देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जाती किंवा वर्गाचा नाही- पंकजा मुंडे