मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे सांगतानाच 2024च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. यावर सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोलेंना आवाहन केलं आहे.
“फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकासआघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले जात नसेल, तर काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा. असं माझ नाना पटोले यांना आवाहन आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर मविआ सरकार पडेल. काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे जर त्यांना सीएम पद दिले जात नसेल तर काँग्रेस ने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा असे माझे @NANA_PATOLE यांना आवाहन आहे.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 14, 2021
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणे दिल्ली दौऱ्यावर; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं
“दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत”
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती- नवाब मलिक
राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झाली आहे- प्रवीण दरेकर