मुंबई : राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याबाबत उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे.
आज MPSC परीक्षेबाबत बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा सुरु झाली. तेव्हा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याशिवाय हा निर्णय होऊ शकत नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यातील हातावर पोट असलेली गोरगरीब जनता, व्यापारी, छोटे व्यवसायिक यांच्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेतल्यास लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल, असंही प्रविण दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मनोहर भिडेंवर कारवाई करणार?; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य
आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना धीर
“निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस द्या”
“ज्यांचं तोंड फाटलेलं आहे त्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही”