‘…तर भाजप सत्तेतून बाजूला जाईल’- जयंत पाटील

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : इस्लामपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांची आभार सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 37 टक्के मते घेऊन देशाच्या सत्तेत आले होते. मात्र या निवडणुकीत ते 32-33 टक्क्यां पर्यंत खाली आल्यास,ते देशातील सत्तेतून जाऊ शकतात, असं वक्तव्य जयंतराव पाटील केलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणीला भाजपचा पाठिंबा!

हातकणंगले मतदार संघातून महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील हे चांगल्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्‍वासही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान,महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ.सत्यजित पाटील,सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ.मानसिंगराव नाईक, युवा नेते प्रतिक पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

“…अन् राज ठाकरे माध्यमांवर भडकले; नेमकं कारण काय, वाचा सविस्तर”

“प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते”

2004 मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद केलं असतं तर…; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here