…तर बाळासाहेबांनी त्यांना 5 फूट जमिनीत गाडलं असतं; शिवसेनेचा घणाघात

0
361

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून देशात सुरु असणाऱ्या घडामोडींवर तसेच बाळासाहेब आज असते तर त्यांनी काय केले असते यावरही भाष्य केलं आहे.

स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास रचला जात आहे. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खऱे स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे. त्याच गांजाड्यांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारुन महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, होय होय, 1947 पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भिकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच तारेत बरळू लागले आहेत., असा हल्लाबोल सामनातून केला आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचे मिशन दिल्ली; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”

दरम्यान, लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत, भगतसिंगांपासून ते चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते., असा घणाघातही सामनातून केला.

महत्वाच्या घडामोडी –

कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची संजय राऊतांवर टीका

महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्या लायकीचे; गापीचंद पडळकरांचा हल्लाबोल

‘शिवाज्ञा’ राज ठाकरेंनी व्यंग्यचित्रातून अर्पण केली बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here