कोल्हापूर : मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकीकडे भाजपाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत गेल्या 60 वर्षात काँग्रेसने केलेल्या कामावरच देशाचा कारभार सुरु असल्याची टीका केली आहे. त्यांच्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
पंतप्रधान त्यांची सूचना मान्य करतील, मी त्यांच्या वतीने निरोप देतो. पण त्यांनी जरा हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर शांतपणे बसावं, डोळे मिटावे आणि तुमचंही मत हेच आहे का असं विचारावं. त्यावेळी ते वरुन एक थोबाडीत मारतील,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय.
दरम्यान, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना, प्रकल्प दिसत आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धा…हे कोणालाही नाकारता येणार नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही, त्यांना मस्ती आली आहे; हसन मुश्रीफांचा हल्लाबोल
‘या’ सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं- चंद्रशेखर बावनकुळे
देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा- नाना पटोले