Home महाराष्ट्र “…अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”; एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

“…अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”; एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : राज्यशासन जर विलिनीकरण करू शकत नसेल तर आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या, असं निवेदन सिडको बसस्थानक येथे जवळपास 400 ते 500 कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिलं आहे.

हे ही वाचा : भाजपच्या ‘या’ निलंबित आमदाराने लग्न समारंभात केला भन्नाट डान्स; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

आता जीव गेला तरी विलीनीकरणाच्या मागणीवरून आम्ही मागे हटणार नाही, असं सांगतानाच एकीकडे रुजू व्हा म्हणत आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमच्यावर होणाऱ्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार असल्याचे सिडको बसस्थानक येथे संपास  बसलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एसटीचा संप पुकारणाऱ्या संघटनेने मुंबईत संघातून माघार घेतल्याची घोषणा केली असली तरीही राज्यासह मराठवाड्यात अजूनही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा हट्ट सोडलेला नाही.

महत्वाच्या घडामोडी – 

फडणवीसांना सरकार बनविण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“कन्येच्या लग्नसोहळ्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण”

मी केंद्रीय मंत्री आहे, मला अशी नोटीस पाठिवता येत नाही- नारायण राणे