रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले त्या माणसाबद्दल बोलायला नको, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते रत्नागिरीत माध्यमांशी बोलत होते.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शपथविधीच्या पहाटे काय घडलं ते अजून सांगत नाहीत. जर सांगितलं तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही, असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
दरम्यान, निलेश राणेंनी यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. आपल्या शपथविधीला येणारा माणूस शपथविधीला येतो, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो. त्यांच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं केलं जातं. तोच माणूस आज भाजपवर टीका करतो ती टीका का सहन करायची, असा प्रश्न यावेळी निलेश राणेंनी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
“भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष आहे असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या”
शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?- अतुल भातखळकर
…तर शरजील नावाच्या कारट्याला आमच्याकडे सोपवा; नितेश राणे
हरामी शरजील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे- निलेश राणे