आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहे. या दोन्ही नेत्याचा एकमेकांप्रति जिव्हाळा सर्वांना माहिती आहे. एका मुलाखतीत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.
हे ही वाचा : मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश
श्रीरामपुरात एक सभा झाली होती. यादरम्यान अजित पवारांनी मला त्यांच्या भाषणानंतर बोलायला सांगितलं. मात्र, प्रोटोकॉल असल्याने मी भाषण देण्यास नकार दिला. मात्र अजितदादांनी आदेश दिल्याने मी भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातीला मी विराट कोहलीनंतर हरभजन खेळतोय, असा उल्लेख केला होता. यावर अजितदादांनी अरे हरभजन देखील सामना जिंकून देतो, हे तू विसरू नको, असा सल्ला दिला, असं धनंजय मुंडे यांनी सांगितले .
दरम्यान माझ्या भाषणात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव आहे. अनेकांना माझ्या भाषणात महाजन, मुंडे आणि आर आर आबा देखील दिसतात, असं सांगतानाच अजित पवार नेहमी प्रोत्साहित करीत असतात , असंही धनंजय मुंडे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपचं सरकार येणं आवश्यक- प्रवीण दरेकर
“ठाकरी बाण्यानं विरोधी पक्ष दिशाहीन, भाजप अजूनही सरकार पाडण्याच्या फंदात आणि छंदात”
मी ठरवून भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ दिला नाही- एकनाथ खडसे