“MIM नं कोणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न, आम्ही मात्र स्वबळावर लढणार आणि जिंकणार”

0
479

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एमआयएमनं कोणत्या पक्षासोबत जायचे हा त्यांच्या प्रश्न आहे, आम्ही मात्र स्वबळावर लढणार आणि जिंकणारही., असा दावा पंकजा मुंडेंनी यावेळी केला. त्या औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हे ही वाचा : MIM ही भाजपची बी टीमच, आघाडी नाहीच- उद्धव ठाकरे

एमआयएम कुणासोबत जाते यावर मी बोलण्याचे काही कारण नाही. त्यांना कुणाबरोबर जायचे ते जावे, आमचे नाणे खणखणीत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो की कोणत्याही निवडणूका भाजपा स्वबळावर लढवणार आणि जिंकणारही, असा दावा पंकजा यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी जोडताय?- संजय राऊत

MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते?; मनसेचा शिवसेनेला सवाल

‘…मग मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो’; MIMच्या ऑफरवरुन शिवसेनेची फडणवीसांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here