मुंबई : राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. याच पार्श्वभूमीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी ट्वीट केलं आहे.
करोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरीत घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात”, असं रोहीत पवार यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर प्रयत्नांना यश येतं”
…तर भाजप विचार करेल; राऊत-शेलार भेटीवर सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य
राऊत-शेलार यांची गुप्त भेट; प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले…
लवकरंच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप?; शेलार-राऊत भेटीने चर्चांना उधाण