Home देश …तर दीर्घकाळासाठी जगाला परिणाम भोगावे लागतील; चीनची धमकी

…तर दीर्घकाळासाठी जगाला परिणाम भोगावे लागतील; चीनची धमकी

नवी दिल्ली : अमेरिकेकडून दबाव वाढल्यानंतर चीनने संपूर्ण जगाचं नुकसान होईल अशी धमकी दिली आहे.

चिनी सरकार-नियंत्रित वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या संपादकीय लेखात असं म्हटलं आहे की, सर्व मोठ्या देशांना अमेरिका चीनविरूद्ध भडकवत आहे आणि त्यांच्या बाजूने उभी करत आहे. पण याचा परिणाम वाईट होईल असं चीननं म्हटलं आहे.

अमेरिकेच्या बरोबरीलाच चीनचा बाजार आहे. जवळपास 100 देशांशी चीनचे व्यापार संबंध आहेत, परंतु असे संबंध बिघडवण्याचा अमेरिका प्रयत्न करत आहे. जगाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असं चिनी वृत्तपत्रानं  म्हटलं आहे.

दरम्यान, जगाला मोठ्या काळासाठी नुकसान सहन करावं लागेल. सध्या सुरू असलेल्या कोविड साथीच्या रोगाचीतर ही पहिली लाट आहे. साथीच्या रोगाचा प्रकोप झाल्यानंतरही अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय मदत बंद केली आहे. याचा मोठा परिणाम सगळ्यांना भोगावा लागणार आहे, असंही चीननं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का?”

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार; घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राजगृह निवासस्थान तोडफोडप्रकरणी रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

दोन करोना पॉझिटिव्ह नेत्यांच्या संपर्कात आल्यामुळे अमोल कोल्हे क्वारंटाइन