“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”

0
440

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. यानंतर आमदार रवी राणा यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले होते. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत रवी राणा व नवनीत राणा यांना टोला लगावला आहे. बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले, असं रूपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो; भास्कर जाधवांचा नितेश राणेंना टोला

“ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन”

“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here