मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत राज्य सरकार व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र हे करंटे पांढऱ्या पायाचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं. राज्य सरकारने कोर्टात योग्यरित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांना सोबत घेतलं नाही, वकिलांना मार्गदर्शन केलं नाही. गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावे जोडले नाही, असा गंभीर आरोप सदाभाऊ खोतांनी राज्य सरकारवर यावेळी केला.
अशोक चव्हाण तुम्ही फार हुशार आहात. तुमचा ‘आदर्श’ घेण्यासारखा आहे. 2 वर्षे अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होता का?, सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार पुन्हा गेले. राज्य सरकार का पुन्हा कोर्टात गेले नाही? असा प्रश्न सदाभाऊ खोतांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
“अशोक चव्हाणांना राग येतो म्हणून आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प बसणार नाही”
“कोरोनाच्या संकटकाळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”
माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिकांना ठावूक नसावा किंवा…- केशव उपाध्ये
राज्याच्या हिताचे प्रश्न केंद्राकडे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडला- रोहित पवार