आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अमरावती : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल मुस्लिमांनी अमरावती जिल्ह्यात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावावर लाठीमार केला होता. त्यामुळे शहरात प्रचंड हिंसाचार झाला होता.
हे ही वाचा : “शरद पवार-उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”
अमरावतीत झालेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात 4 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.
दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपने बंदची हाक दिली होती. आज सकाळी अमरावतीत मोठा जमाव जमा झाला आणि त्यांनी प्रचंड तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. सध्या मात्र अमरावतीत तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्ह्यात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कंगणा रणाैतविरूद्ध शिवसेनेचं आंदोलन; कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
…तर आज बाळासाहेबांनी संजय राऊतांच्या थोबाडीत दिली असती; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
“औरंगाबादेत शिवसेनेचा मोर्चा; मनसेची टीका, मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा…”