पिडीत डॉक्टर तरुणीच्या आईची दोषींना जिवंत जाळण्याची मागणी

0
167

हैदराबाद : तेलंगणातही माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. हैदराबाद शहराच्या बाहेरील शादनगर परिसरात एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला आहे. ही तरुणी कोल्लुरु येथील एका पशु वैद्यकीय दवाखान्यात काम करत होती. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या आईने दोषींना जिवंत जाळाण्याची मागणी केली आहे.

पीडित तरुणीच्या आईने पोलिसांवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे. माझ्या निरागस मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषींना जिवंत जाळावे, अशी माझी इच्छा आहे, अशी मागणी पिडीत तरुणीच्या आईने केली आहे.

मुलीचा फोन आल्यानंतर माझी छोटी मुलगी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहचली. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याऐवजी तिला ते क्षेत्र आपल्याकडे नसल्याचं सांगत शमशाबाद पोलिस ठाण्याला जाण्यास सांगितलं, असंही पिडीतेच्या आईने म्हटलं आहे.

दरम्यान, निर्भया प्रकरणानंतरही देशभरात बलात्काराच्या घटना सुरुच आहेत. यात वाढ होताना दिसत आहे. कायद्याचा धाकही नसल्याचं या घटनांमधून वारंवार समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here