Home पुणे दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात केंव्हाही निवडणुक लागू शकते; आशिष शेलारांनी टाकला...

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात केंव्हाही निवडणुक लागू शकते; आशिष शेलारांनी टाकला बाॅम्ब

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मावळ : राज्यातील महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज भांडण सुरू आहेत. त्यातील दोन पक्षांचे संकेत लक्षात घेतले तर राज्यात कधीही निवडणूक लागेल, असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं. ते मावळमध्ये बोलत होते.

हे तीन पक्षाचे सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. काँग्रेस ‘भुरटी’ आहे. जे मिळेल ते घेते! ते झोलबाज आहेत. शिवसेना दगाबाज आहे. मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मत मागितली आणि दगाबाजी केली. दगाबाजीने का असेना, मुख्यमंत्री झालेत! दगाबाजीने सत्तेत आले तरी ते विकास करतील असे वाटले होते पण…, असा टोला शेलारांनी यावेळी लगावला.

दरम्यान, सध्या दलाल राज्य चालवत आहेत. अनेक खाती दलालांकडून चालवली जात आहेत. विविध ठिकाणी आयकर खात्याने टाकलेल्या धाडींच्या संदर्भात ते म्हणालेत की, सात दिवसांपासून आपण पाहतो आहे की आयकर विभाग काय करतो आहे., असंही शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…तर नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

गुलाब चक्रीवादळामुळं समजलं, गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे; मनसेचा पलटवार

“पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, धनंजय मुंडे म्हणतात, तुम्ही तर…”

“काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी दिली असेल”