राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; कोकणात असंख्य समर्थकांसह ‘या’ पक्षाचे चार बडे नेते राष्ट्रवादीत

0
733

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दापोली :  दोन दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. संदीप राजपुरे यांच्यासंह उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, खेडचे तालुकाप्रमुख दत्ताराम गोठल आणि युवासेना दापोली उपतालुका अधिकारी विकास जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला

हे ही वाचा : ‘राजकारणात येण्यासारखे मुख्यमंत्र्यांमध्ये एकही गुण नाही’; निलेश राणेंचा टोला

कुणबी सेवा संघाच्या सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी आम्ही स्वमर्जीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, दोन महिन्यांत खेड येथे दोन लाख लोकांच्या उपस्थितीत पक्षाचा भव्य मेळावा घेणार असल्याची घोषणा संदीप राजपुरे यांनी केली.

दरम्यान, या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी चौघांचे पक्षात स्वागत केले व त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळ मिळाले असल्याचे सांगितले.

महत्वाच्या घडामोडी – 

 जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का; ‘या’ निवडणुकीत एकनाथ खडसेंचा विजय निश्चित

भाजप हे एक अजब रसायन, स्वतःच स्वतःला क्लीन चिट देत सुटले; शिवसेनेचा टोला

काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरुच; अहमदनगरमधील ‘या’ मोठ्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here