मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे नाटकासह मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने ‘भारदस्तपणा’ मिळवून देणाऱ्या जेष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो किंवा महाभारतातील धृतराष्ट्र असो. रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांमध्ये अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्याने मोठी हानी झाली, अशी प्रतिक्रिया यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली.
महत्वाच्या घडामोडी-
दुसरा टी-20 सामना : भारताने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू माझ्या मागे लागलेत- असदुद्दीन ओवेसी
“मिरजेत तरूणाच्या डोक्यात दगड घालून निर्घूण खून”
“ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन”