मुंबई : पालघर साधू हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणात गतीने तपास पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पावले महाविकास आघाडी सरकारने न उचलल्यामुळे आज एक वर्ष पूर्ण झाले तरी या प्रकरणात न्याय मिळू शकलेला नाही”, असं दरेकर म्हणाले आहेत.
तुम्ही हे वाचलात का?
ज्याचं आयुष्यचं लुबाडणूकीत गेलं त्यांनी अनिल परबना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही- विनायक राऊत
सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपलं मौन सोडावं आणि सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी”, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी यावेळी केली.
पालघर साधू हत्याकांडाची त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी झाली, तरचं साधूंना न्याय मिळू शकेल. आज भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष @AcharyaBhosale यांच्यासमवेत मंत्रालयाजवळ राज्य सरकार विरोधात लाक्षणिक उपोषण केले. @BJP4Maharashtra #PalgharSadhus #Palghar pic.twitter.com/3gV5krGPcM
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
इथं माणसं मरत आहेत, तुम्ही मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?- नारायण राणे
“ज्यांनी राज्यातल्या घराघरात भांडणं लावली, त्यांच्याच घरात आता टोकाची भांडणं आहेत”