Home महाराष्ट्र वाघाला घाबरून पटकन म्याव, म्याव अशी प्रतिक्रिया आली असेल; शिवसेनेचा नितेश राणेंवर...

वाघाला घाबरून पटकन म्याव, म्याव अशी प्रतिक्रिया आली असेल; शिवसेनेचा नितेश राणेंवर पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहे. अशातच या अधिवेशनादरम्यान एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला.

हे ही वाचा : “तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; पक्षप्रवेशानंतर ‘या’ नेत्यानं 3 महिन्यातच पक्षाला ठोकला रामराम”

या व्हिडिओत शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात दाखल होताच भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपली. यावरून आता शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

जेंव्हा त्यांनी म्याव म्यावची प्रतिक्रिया दिली त्यावर आदित्य ठाकरे किंवा इतर कोणीही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यावरुनच सुसंस्कृत आणि असंस्कृतपणा तिथे स्पष्ट दिसला. आदित्य ठाकरेंना शिवसेनेचे वाघ असंच म्हटलं जातं. त्यामुळे आदित्या ठाकरेंना पाहून त्यांना भीती वाटली असेल म्हणून पटकन एक प्रतिक्रिया म्याव म्याव झाली असेल तर माहिती नाही, असा टोला पेडणेकरांनी यावेळी नितेश राणेंना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“तुमचं सरकार घोटाळेबाज होतं, म्हणून तर तुम्हांला सगळीकडे घोटाळेच दिसतात”

‘…अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल’; एकनाथ शिंदेंचा इशारा

“विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराच्या नावावर शिक्कामोर्तब”