मुंबई : वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, असा पलटवार संजय राऊत यांनी यावेळी केला. यावर परत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झाला आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेना विश्वास असणारा पक्ष, स्व. बाळासाहेब ठाकरेंनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता”
“अखेर ठरलं! नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव”
…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती आणखी चांगली असती- जयंत पाटील
“शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे, वाट लावली मुंबईची”