Home महाराष्ट्र “शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे”

“शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे”

मुंबई :  महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनलेलं पाहायचं आहे, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते

शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे. येत्या काळात तिन्ही पक्ष कायमचे विरोधात बसतील, आपण आता विरोधकांचं काम करत राहू, असं जे. पी. नड्डा म्हणाले.

महाराष्ट्राच्या सरकारमध्ये उजव्याला डाव्याचं माहीत नाही. राजकारणात धोका होत असतो. येत्या काळात तिन्ही पक्ष नेहमीसाठी विरोधकांमध्ये जाऊन बसतील. येणाऱ्या काळात आम्हीच राज्यकर्ते असू, अशा विश्वास जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आम्ही जगातील मोठा पक्ष झालो असून, आता आम्हाला अजेंडा सेट करावा लागणार आहे. शिक्षणाच्या धोरणावर चर्चा करत असताना नेहमीच वाद होतात. पण आम्ही मांडलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण सर्वांनी एकमतानं मंजूर केलं आहे, असंही जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बेअरस्टाेची नाबाद शतकी भागीदारी

“जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल”

“ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन”

एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर- प्रकाश आंबेडकर