‘ठाकरे सरकार ड्रग्स माफियांच्या तालावर नाचतेय; अतुल भातखळकरांची टीका

0
312

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो आणि कागदपत्रांचे फोटो ट्वीट करुन एकच खळबळ उडवूवन दिली आहे. नवाब मलिक यांनी पहचान कौन असं म्हणत वानखेडे यांचा पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार निशाणा साधलाय.

‘एका मराठी अधिकाऱ्याविरुद्ध शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले तिघाडी सरकार आकाश पाताळ एक करते आहे. ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल त्याला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरसावले आहेत. ड्रग्ज माफियांच्या तालावर ठाकरे सरकार नाचते आहे’, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : भाजप विरोधात बोलाल तर तुमच्या घरावर केव्हाही ईडीची धाड पडू शकते; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराचं मोठं वक्तव्य

NCB चे डायरेक्टर समीर वानखेडे यांचे बोगस सर्टिफिकेट नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. वानखेडे हिंदू नसून मुस्लीम असल्याचा खोडसाळ दावा केला आहे. ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते बनलेल्या मलिक यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे बनविणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याबद्दल FIR दाखल करावा’, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या जन्म दाखलाचा फोटो शेअर करत इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप केलाय. यात समीर वानखेडे यांचं नाव समीर दाऊद वानखेडे असून धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख केलाय.

महत्वाच्या घडामोडी – 

संजय राऊतांनी पाठवलेल्या पत्राला लवकरच उत्तर देणार- किरीट सोमय्या

…यावरूनच ठाकरे सरकारचं पाकिस्तान वरचं प्रेम दिसून येतं; निलेश राणेंची टीका

देवेंद्र फडणवीसांनी चार महिन्यात सरकार पडणार या स्वप्नातून बाहेर पडावं- अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here