शरद तांदळे प्रॅक्टिकल सांगणारा माणूस आहे. उद्योजक होणासाठी ‘जिद्द, परिश्रम, चिकाटी’ लागते असे फेक वाटणारे अन गुळगुळीत असणारे वाक्य सांगून ऐन तारुण्यात सहज भरकटू शकणाऱ्या पोरांना उगीच ज्ञानाचे ओव्हर डोस न पाजता मोजकं अन कामाचं सांगतात हे खुप विशेष आहे.
उद्योजक होणासाठी सर्वात आधी पॅन कार्ड लागतं, बँक खातं लागतं.
अशा प्रॅक्टिकल गोष्टी सांगण्याची गरज आहे सध्या. नाहीतर अनेकांना यशस्वी झाल्यावर उगीच बांबूने शेंगा झोडायची सवय असते. स्व:ताचीच लाल करत मी कसे वडापाव खाऊन दिवस काढले, मी किती विद्वान होतो वगैरे वगैरे ..तसल्या बाजारू वक्त्या पासून व पुस्तका पासून 4 हात दूर राहिलेलं बरं …!!
खरं तर पुस्तकं वाचून कोणी उद्योजक, श्रीमंत वगैरे होत नसतो. स्पोकन क्लासेस, PD चे लावून कोणी स्मार्ट होत नाही.
हे लेखक स्वतः शरद तांदळे सांगतात.
पण पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणी प्रमाणे ऐन तारुण्यात काय केलं पाहिजे व काय नाही केलं पाहिजे हे उत्तम पद्धतीने नेमकं सांगितलं आहे.
कॉलेज, युवा नेता, MPSC, घर, नको ते उद्योग यात होणारी जीवाची व कुटुंबाची हेळसांड उत्तम पद्धतीने मांडली आहे. त्यात कुठेही नकली किंवा नाटकी पणा जाणवत नाही.
हे ऐन कॉलेज च्या दिवसात प्रत्येकाच्या आयुष्यात असं होतं त्यामुळे जितकं लवकर हे वाचलं जाईल तितकं फायद्याचं आहे. वेळ पडल्यावर कोणी रुपया देत नाही असे जमिनीवर आणणारे अनेक अनुभव सांगितले आहेत.
शेती बटई ने दिली तर उत्पन्न कमी होतं,
लोकांपेक्षा आपला बाप आपल्याला काय समजतो हे महत्त्वाचं आहे,
कमी वयात मिळालेली प्रसिद्धी घातक ठरू शकते,
भाषेला ट्रान्सलेटर मिळतो, कर्तुत्वाला नाही,
मित्र कमी असले तरी चालेल पन कामाचे असावेत,
असे अनेक उत्तम दर्जाचे विचार कम डायलॉग अनुभवातून आलेले जसेच्या तसे मांडले आहेत.
आंत्रप्रेन्युअर शब्दाचा अर्थ माहीत नसलेला पोरगा यशस्वी आंत्रप्रेन्युअर होऊ शकतो,
इलेक्ट्रॉनिक विषयात नापास झालेला पोरगा चांगला इलेक्ट्रिकल गुत्तेदार होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
आई-वडिलांच्या भावना जपल्या पाहिजेत.
या सोबतच व्यवसायातली रिस्क, नम्रता, संयम, दुनियादारी, गुरू, घर, नातेवाईक, गाव, कॉलेज, मार्क, भाषा, नाना विचार या सगळया गोष्टी जनभवानेला हात घालणाऱ्या आहेत.
एकदम सोप्या भाषेत जसं आहे सांगितल्याने ते अधिक प्रॅक्टिकल वाटतं.
एखाद्या चित्रपटाची रंजक स्क्रिप्ट वाटावी असं हे पुस्तकं नक्की वाचनीय आहे यात शंका नाही.
– चांगदेव गिते
महत्वाच्या घडामोडी –
“देशमुखांचा राजीनामा ही तर सुरुवात, आगे आगे देखो होता है क्या?”
“कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन, सरकार महाराष्ट्राची फसवणूक करतंय”
येत्या 8 दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा