विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झालीये; नीलम गोऱ्हेंचा टोला

0
389

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज बोलताना विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झाली आहे, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला. त्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

हे ही वाचा : पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी येणार एकत्र?; चर्चांना उधान

इंधन दरवाढ, कोरोना काळातील अपयश आणि अच्छे दिनाच्या स्वप्नांचा झालेला चुराडा याचे अपयश झाकण्यासाठी भाजपकडून दररोज कथित घोटाळे काढण्यात येत आहेत. मूळ प्रश्नांपासून लोकांना भटकावण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झाली आहे, असा टोमणा नीलम गोऱ्हे यांनी यावेळी लगावला.

भल्या पहाटेचे काही तासांचे सरकार आल्यानंतर केंद्राकडून आलेले दहा हजार कोटी रुपये परत करण्याचा कोत्तेपणाचा निर्णय भाजपाने घेतला होता. अन् आता शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार मदत करीत असताना कोट्यवधींची मदत यांना फुटकी कवडी वाटते याचे आश्चर्य आहे., अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी – 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज अज्ञात व्यक्तीकडून हॅक; सायबर सेलकडे तक्रार

“शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या माथेरानच्या’ त्या’ नगरसेवकांचा फैसला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात”

“एडन मार्क्रमची नाबाद अर्धशतकी खेळी; दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने दणदणीत विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here