कोल्हापूर : ‘पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभं करण्याचं काम राज्यशासन करेल अशी ग्वाही देवून पाणी ओसरेल तसे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्यशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत येथील राजर्षी शाहू सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अजित पवार बोलत होते.
भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सन 2005, 2019 व 2021 मधील पुराच्या पाण्याच्या पातळीचा विचार करुन महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. तर राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांची कामे राज्य शासनासह वर्ल्ड बँक व अन्य बँकांच्या सहकार्यातून केली जातील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नदीच्या प्रवाहाला अडथळा येऊ नये, यासाठी नदीपात्रातील व ओढ्यावरील अवैध बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देवू नका, अशा सूचनाही अजित पवारांनी यंत्रणेला केल्या आहेत
महत्वाच्या घडामोडी –
…तर कोश्यारींनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा- नाना पटोले
इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नसेल; निलेश राणेंचा घणाघात
पर्यटन दौरा संबोधून लोकशाहीची थट्टा करणे योग्य नाही- प्रविण दरेकर
जनतेच्या आक्रोशामुळे शिवसेना हादरुन गेली, त्यामुळेच…; नारायण राणेंचा हल्लाबोल