मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. पिंपरी चिंचवडमध्ये राज्यव्यापी ओबीसी आरक्षण बचाव बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
राज्य सरकारनं वेळेत कागदपत्र सादर न केल्यामुळं हे आरक्षण धोक्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्रातून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ओबीसी विषयावर चर्चा आणि भूमिका ठरवली होती. वेळ देऊनही सरकारकडून वेळकाढूपणा केला जातोय., असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. मात्र ओबीसीला तर आता आम्ही मिळवून देऊच. अशी भूमिका घेत आरक्षण रक्षणार्थ रस्त्यावर उतरणार, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी”
महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…; नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ
ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही- सदाभाऊ खोत
प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; म्हणाले…