Home महाराष्ट्र “असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये”

“असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये”

मुंबई : दिल्ली सारखं महाराष्ट्रातही मोफत वीज मिळण्याचं बोललं जात होतं.  शंभर युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याबाबतचं वृत्त वाचलं. पण असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

असा निर्णय झाल्यास या योजनेसाठी दर वर्षी सुमारे 7 हजार 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ‘महावितरण’ आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती पाहता हा भार कोण सोसू शकणार?, हे पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शंभर युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज पुरविण्याची योजना राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. याबाबत ग्राहक संघटनांशी चर्चा झाली असून, येत्या वर्षाअखेरपर्यंत ही योजना लागू करणार असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

 त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत- शरद पवार

…म्हणून मी दिल्लीत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस

आपल्यातील भांडण विसरा आणि बाळासाहेबांचं खरं स्वप्नं जामिनीवर येऊन पूर्ण करा- अमृता ठाकरे

जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी- रुपाली चाकणकर