Home पुणे EWS च्या लाभ देण्याने मराठा आरक्षणास धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार- संभाजीराजे

EWS च्या लाभ देण्याने मराठा आरक्षणास धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार- संभाजीराजे

मुंबई : मराठा समाजातील उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी EWS लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे, पण यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला फटका बसण्याची शक्यता आहे. आर्थिक मागास वर्गाच्या सवलतीमुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्यांस पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल, असं संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाला धोका झाल्यास त्यांस सरकार जबाबदार राहील, असंही संभाजीराजे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मैक्सिकोच्या बीचवर कंगणाचा बिकीनी अवतार, चाहत्यांकडून शिव्यांचा भडीमार

“सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिलं पाहिजे”

“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”

“आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचं आहे”