Home महाराष्ट्र राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत- रोहित पवार

राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत- रोहित पवार

मुंबई : देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडत आहेत.  पेट्रोल दरवाढीवरून आता राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी केंद्र सरकारवर टीका करत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी केली होती. याला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

“राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपच्या एका नेत्याने केली. पण 2014 च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी 2014 च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज 350% नी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा 32.90 रुपये तर राज्याचा 28.35 रुपये कर आहे. असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी रूपयाची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला, तर आम्ही रस्त्यावर उतरू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

“योगगुरू रामदेव बाबांविरोधात डाॅक्टरांचं उद्या 1 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन”

अनिल परब यांच्यासाठी वेगळे नियम का?; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे