Home महाराष्ट्र राज्यात अनेक संकटे आली, पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं...

राज्यात अनेक संकटे आली, पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं काैतुक

मुंबई : राज्यावर एकापाठोपाठ अनेक संकट आली. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिंमत दाखवली, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं काैतुक केलं.

एकीकडे पूरग्रस्त घरांची बांधणी करणं हे सरकारसमोर आव्हान आहे. दुसरीकडे मागील 100 वर्षांपासून मुंबईमध्ये कष्ट करून महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी ज्यांनी घाम गाळला, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल पडतंय, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. म्हणून हा प्रश्न सुटला आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होतोय याचा मला आनंद होतोय, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत, तुम्हाला सेना भवनच्या आत नेवून फटके टाकणार; निलेश राणेंचा हल्लाबोल

“शिक्षणमहर्षी व मराठवाड्याचे साने गुरूजी अशी ओळख असलेले आलुरे गुरूजी यांचं निधन”

देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे…; विजय वडेट्टीवारांचा टोला

“शरद पवारांमुळेच मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली”